Like

Tuesday, February 8, 2011

 सात जन्मांची सफ़र

सात जन्मांच्या सफरीला चालशील माझ्यासवे?
धुंद चांदनचुऱ्यात, सांग भीजशील माझ्यासवे?
तू विचारशील, ''रहायच कुठे?"
मी म्हणेन, उघड्या-नीळया  छताखाली
उभारू चार भिंती कुठेही.
तू म्हणशील, "खायच काय?"
मी म्हणेन, मिळकतीचे  दोन घास
भरवू एकमेकांना प्रेमाने.
मग प्रश्न येइल, जगण्याचा, सुख दु:खाचा
मी तुला खूष ठेविनच असं  नाही.
पण तू दु:खी असतांना मात्र
मी खूष राहणार नाही.
मी माझ्यातला प्रियकर हरवू देणार नाही.
तू ही तुझ्यातली प्रेयसी जप.
सुखाच्या लाटा येतच राहतील
बेसावध आपण भिजतच राहू.
निथळत्या काठावर प्रेमाचे ओघळ सूकताना
मग मी परत म्हणेन,
'सात जन्मांच्या सफरीला, सांग चालशील माझ्यासवे?'

No comments:

Post a Comment